ठळक बातम्या
sindhuprabhat logo
ठळक बातम्या
श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी प्रणित तर्फे स्वच्छता व आरोग्य शिबीर संपन्न .
आताच शेयर करा
Oct 8, 2022

मुंबई : गांधी जयंतीचे औचित्य साधून अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ( त्रंबकेश्वर ) या संस्थेतर्फे २ ऑक्टोबर गांधी जयंतीनिमित्त जुहू बीच परिसरामध्ये स्वच्छता अभियान व आरोग्य शिबिर संपन्न झाले.
परमपूज्य गुरू माऊली यांचे जेष्ठ सुपुत्र अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ सचिव आदरणीय श्री. चंद्रकांत दादासाहेब मोरे यांच्या व मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता अभियान जुहू बीच येथे संपन्न झाले.

याप्रसंगी माजी महापौर पेडणेकर म्हणाल्या की दिंडोरी प्रणित सेवा मार्गाचे कार्य २० टक्के अध्यात्म आणि ८० टक्के समाजकारण या तत्वावर चालत आहे. परमपूज्य गुरुमाऊली यांचे सर्व सेवेकरी यांना स्वच्छता अभियान, अन्नदान, महावस्त्र दान आणि।मोफत आरोग्य शिबीर राबवून ८०.टक्के समाजकारणाची शिकवण दिली.
याप्रसंगी चंद्रकांत दादा मोरे यांनी जमलेल्या सर्व सेवेकरी यांना मुंबई झोन ५ व संपूर्ण महाराष्ट्रात अशाप्रकारे स्वछता अभियान व मोफत आरोग्य शिबीर सर्वत्र घेण्यास आवाहन केले. मुंबईत हे समाज कार्य राबविण्यासाठी माजी महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी सर्वतोपरी सहकार्य केले. मोफत नाडी।परीक्षण व आरोग्य शिबिराचा ५०९ जणांनी लाभ घेतला.

या उपक्रमाबद्दल बोलताना चंद्रकांत दादा मोरे म्हणाले की आपल्याला एक दिवस स्वच्छता करून थांबायचे नाही. जगभरातील ८ हजार पेक्षा जास्त केंद्राच्या माध्यमातून आपल्याला वर्षभर सातत्याने हे स्वच्छता, वस्त्रदान, व मोफत आरोग्य शिबीर राबवायचे आहे

संबंधित लेख

सर्व धर्मसमतेचा संदेश देणारी नववर्षाची शोभायात्रा.

विरार : (अक्षरा मांडवकर)   गुढीपाडवा म्हणजेच नवीन वर्ष या नव्या वर्षाचा उत्साह आनंदमय वातावरणात संपन्न झाला याच नव्या वर्षात सालाबादप्रमाणे याही...

वसईत निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन.

नालासोपारा : संपूर्ण महाराष्ट्रातून अधिकारी घडविण्यासाठी तिमिरातूनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा...