आरोस : सावंतवाडी तालुक्यातील आरोस गावचे सामाजिक कार्यकर्ते संतोष मोहन परब यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले असून त्यांच्या निधनाने आरोस गावात शोककळा पसरली आहे.
आरोस गावातील माउली वाडी येथे राहणारे सामाजिक कार्यकर्ते संतोष परब हे नेहमी सामाजिक कार्यात स्वतःला झोकून कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत उपस्थित राहून सहकार्य करायचे.नुकत्याच झालेल्या तौक्ते चक्रीवादळात रस्त्यावरील झाडे, उन्मळून पडलेले विद्युत खांब उभे करून गावात वीज पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी त्यांनी हातभार लावला. गावातील देवस्थानात ते नेहमी सहभागी व्हायचे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच आरोस गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा, बहिणी, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना परब कुटुंबियांना हे दु:ख पचवण्याची शक्ती देवो संतोष यास सिंधू प्रभातच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.