अग्निशमन विभागाला राष्ट्रपती शौर्य पुरस्कार.
नालासोपारा : वसई विरार शहर महानगरपालिकेच्या बालकल्याण विभागाने राष्ट्रीय पुरस्कार मिळवले होते. आता अग्निशमन विभागाला राष्ट्रपतींच्या मार्फत शौर्य पुरस्कार मिळाल्याने पालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. अग्निशमन दलाने गॅस गळती रोखून शहराला स्फोटापासून वाचविल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
२८ मार्च २०१८ रोजी उरण वरुन गुजरातच्या दिशेने गॅस ची वाहतूक करणाऱ्या मालवाहक रेल्वे च्या टाकीला वसई रोड – नालासोपारा च्या दरम्यान गळती झाली मात्र अग्निशमन दलाच्या सतर्कते मुळे मोठी दुर्घटना टळली.
उरण हून गुजरात च्या दिशेने रेल्वे ने वाहून नेत असताना अचानक गॅस गळती सुरु झाली त्याचा आवाज गार्डला आल्यावर त्याने वसई रोड रेल्वे स्टेशन च्या स्टेशन मास्तरना सूचना दिली त्यांनी वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे लिडिंग फायरमन रुपेश पाटील
फायरमन अल्पेश पटेल,संदीप पाटील,निखिल भोईर,
वाहनचालक-विराग म्हात्रे यांनी घटनास्थळी धाव गेवून गॅस गळती रोखली. एलपीजी गॅस वाहतूक करणारी एक ६० डब्याचीं एलपीजी बुलेट कंटेनर, माल गाड़ी उरणहून गुजरातच्या दिशेने चालली होती. वसईच्या रेल्वे ब्रिज च्या ख़ाली मालगाडी येताच गार्डला गॅस गळतीचा आवाज आला आल्यावर ही घटना लक्षात आली.
सकाळी साडेआठ वाजता वसई विरारच्या अग्निशमन विभागाला याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ८ क्रमांच्या बोगीतील गळती शोधून ती रोखून धरली. उरण वरून अधिकारी येई पर्यंत ही गळती रोखण्याचे जबाबदारी अग्निशमन विभागाकडे होती. त्यांनी सर्व परिसर रिकामा केला आणि बाजूच्या रेल्वे लोकल ट्रेन थांबवल्या. सकाळी साडेअकरा वाजता गॅस कंपनीचे अभियंते आले आणि गळती रोखण्यात यश मिळवले. तीन तास अग्निशमन दलाच्या जवानांनी गळती रोखून धरली होती. ती गळती सुरू राहिली असती तर सर्वात मोठा स्फोट होऊन वसई शहराचा परिसर उध्दवस्त झाला असता. अग्निशमन दलाने दाखवलेल्या या कागिरीबदल अग्निशमन दलाला राष्ट्रपती रामनाथ गोविंद यांनी विशेष शौर्य पुरस्कार जाहीर केले होते.नवी दिल्ली येथे झालेल्या एका सोहळ्यात देशाचे गृहराज्य मंत्री नित्यानंद राय यांच्या हस्ते अग्निशमन दलाचे प्रमुख दिलीप पालव यांना हा पुरस्कार प्रदान कऱण्यात आला. वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन विभागाला पहिलाच राष्ट्रपती शौर्य पुरस्कार मिळाला आहे.