ठळक बातम्या
sindhuprabhat logo
ठळक बातम्या
उड्डाणपुलाच्या कामाने वाहतूक कोंडीचे विघ्न ; भुयारीमार्ग तयार करण्याची नागरिकांची मागणी.
आताच शेयर करा
Dec 9, 2021

नालासोपारा : नायगाव पूर्वेकडील जूचंद्र येथील एल सी क्रमांक ९ या रेल्वे फाटकावरील उड्डाणपुलाच्या कामाला सुरवात झाली आहे. त्यामुळे   वाहतूक कोंडीचे विघ्न निर्माण झाले असून हलक्या वाहनांसाठी भुयारी मार्ग बनवण्यात यावा अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत. नायगाव जूचंद्र – बाफाणे ते नायगाव स्थानक व महामार्गाला जोडणारा मुख्य रस्ता गेला आहे या रस्त्याच्या मधूनच वसई ते दिवा रेल्वे जात आहे त्यामार्गावरून मालवाहतूक गाड्या व प्रवासी वाहतूक गाड्या सुरु असतात यासाठी जुचंद्र येथे रेल्वे फाटक बसविण्यात आले आहे. मात्र मालवाहतूक गाड्या व प्रवासी वाहतूक गाड्या यांची संख्या वाढल्याने हे  फाटक वारंवार बंद करावे लागत असल्याने येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना ये जा करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे वाहनांची संख्याही भरमसाठ वाढली असल्याने फाटक बंद झाल्यानंतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहेत. त्यावर उपाययोजना म्हणून याभागात उड्डाण पूल तयार करण्यात येत आहे.

सुरवातीला चार पदरी उड्डाण पूल तयार करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.मात्र ग्रामस्थांचा झालेल्या विरोधानंतर हा पूल दोन पदरी करण्यात येत आहे. करोना काळात या पुलाच्या काम हे रखडले होते. करोनाचा प्रादुर्भाव कमी होताच पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम विभागाने उड्डाणपुलाच्या कामाची सुरुवात केली आहे.तयार करण्यात येणारा पूल हा १ हजार २९० मीटर लांबीचा असून त्यासाठी ८४ कोटी रुपये इतका निधी मंजूर केला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे. सध्याच्या परीस्थितीत रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण करून वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग तयार करण्याचे काम सुरू केले आहे. तसेच आजूबाजूच्या भागाचे सर्वेक्षण व त्यानुसार तयार आराखडे तयार करण्यात आले असून पुलासाठी लागणारे कॉलमचे काम सुरू केले असून  कामाला गती  दिली  जाणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.

दरम्यान वसई सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता जूचंद्र रेल्वे फाटकावरील उड्डाण पुलाचे काम सुरू केले आहे. सध्या एका बाजूचे रस्ते रुंदीकरण करून पुढील काम सुरू करण्यात येत आहे. लवकरात लवकर काम पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.तसेच भुयारी मार्ग करणे हे रेल्वेच्या अखत्यारीत येत आहे.असे सांगितले.

भुयारी मार्ग तयार करण्याची मागणी

जूचंद्र येथील रेल्वे फाटकावर सार्वजनिक बांधकाम विभागाने उड्डाणपुलाच्या कामाची सुरवात केली आहे. परंतु जुचंद्र तथा आसपासच्या अनेक गावांतील नागरीकांच्या रहदारीसाठी व हलक्या वाहनांसाठी या ठिकाणी भुयरी मार्ग ( सबवे) बांधणे अत्यावश्यक आहे. जूचंद्र  विभागाला आसपासची ९ ते १० गावे व्यापार, उद्योगधंदे, बाजार, शाळा, कॉलेज व इतर विविध कामानिमित्त गेल्या अनेक वर्षापासून जोडली गेलेली आहेत. परंतु उड्डाणपुलामुळे आसपासच्या नागरिकांना दरवेळी अंदाजे १ किलोमीटरचा वळसा घालून ये-जा करावी लागेल. दररोज अंदाजे २ ते ३ हजार वाहनांना वळसा घालावा लागेल यासाठी हलक्या वाहनांसाठी भुयारी मार्ग तयार करण्यात यावा अशी मागणी रेल्वे बांधकाम विभागाचे उपअभियंता यांच्याकडे नागरिकांनी पत्राद्वारे केली आहे. तसेच याबाबत केंद्रीयमंत्री कपिल पाटील यांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन देण्यात आले असल्याची माहिती रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी सांगितले आहे.

संबंधित लेख

सर्व धर्मसमतेचा संदेश देणारी नववर्षाची शोभायात्रा.

विरार : (अक्षरा मांडवकर)   गुढीपाडवा म्हणजेच नवीन वर्ष या नव्या वर्षाचा उत्साह आनंदमय वातावरणात संपन्न झाला याच नव्या वर्षात सालाबादप्रमाणे याही...

वसईत निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन.

नालासोपारा : संपूर्ण महाराष्ट्रातून अधिकारी घडविण्यासाठी तिमिरातूनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा...