ठळक बातम्या
sindhuprabhat logo
ठळक बातम्या
पक्षश्रेष्ठींच्या विश्वासाला माजी महापौर रुपेश जाधव यांनी दिला तडा. नालासोपारा जलमय.
आताच शेयर करा
Jun 16, 2021

नालासोपारा ( प्रीती नलावडे ) हवामान खात्याने पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.वसई-विरार मध्ये दमदार हजेरी लावली असून नालासोपारा विरार वसई या ठिकाणच्या सखल भागांमध्ये पाणी साचले आहे वसई-विरार महानगरपालिकेचे माजी महापौर उपमहापौर सभापती अशी अनेक पदे भूषवणारे रुपेश जाधव यांच्या वार्डात ही परिस्थिती आहे अनेक पद भूषवली असली तरी त्याच्या वार्डात सचणाऱ्या पाण्याचा प्रश्न अजून सुटला नाही. त्यामुळे पक्षश्रेष्ठींच्या विश्वासाला माजी महापौर रुपेश जाधव यांनी दिला तडा दिल्याचे बोलले जात आहे. नालासोपारा पूर्वेकडील आचोळे रोड येथे रुपेश जाधव यांचा हा वार्ड असून त्याच रस्त्यावर जाधव यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. असे असताना त्यांनी अनेक पदे आपल्या पारड्यात पाडून घेवून स्वतःचीच कामे करून घेतली कि काय असा सवाल नागरिक विचारत आहेत. गेली अनेक वर्ष बहुजन विकास आघाडीची एकहाती सत्ता आहे. दरवेळी निवडणुकीत विकास केल्याचा दावा रुपेश जाधव हे करीत असतात रोज माझ्या घरी ४५० ते ५०० लोक आपली गाऱ्हाणी घेवून येत असतात अशा फुशारक्या मारीत असतात मात्र त्यांना साध रस्त्याच तुंबणारे पाणी घालवता आले नाही. अलकापुरी रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे या ठिकाणचे रस्ते जलमय झाले असून गटाराचे योग्य प्रकारे नियोजन नसल्याने हे पाणी साचत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वसईत गेल्या २४ तासात आगाशी १२१ मिमी.माणिकपूर १६७ मिमी ,विरार १७२ मिमी,मांडवी २२६ मिमी,निर्मळ १९५  मिमी ,वसई ११५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पालघर जिल्ह्यात एन डी आर एफ च्या २ तुकड्या तैनात.हवामान खात्याने दिलेल्या  अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे  बचावकार्यासाठी एन डी आर एफ  च्या २ तुकड्या पालघर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यातील मनोर मध्ये २० जणांची तुकडी दाखल झाली आहे तर वसई मध्ये १८ जणांची तुकडी दाखल झाली आहे. आज सकाळपासून समुद्रकिनाऱ्या  लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला. शंकरपाडा, तरीचापाडा, शांतीपाडा ,वसईतील मिठागरातील घरांमध्ये पाणी शिरते त्यामुळे सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन वसई प्रांत अधिकारी स्वप्नील तांगडे ,वसई तहसीलदार उज्वला भगत, एन डी आर एफ  चे टीम कमांडर  मनोज कुमार, सर्कल अधिकारी  डी एन जाधव, अर्नाळा सरपंच हेमलता बाळशी यांनी केले.नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित लेख

सर्व धर्मसमतेचा संदेश देणारी नववर्षाची शोभायात्रा.

विरार : (अक्षरा मांडवकर)   गुढीपाडवा म्हणजेच नवीन वर्ष या नव्या वर्षाचा उत्साह आनंदमय वातावरणात संपन्न झाला याच नव्या वर्षात सालाबादप्रमाणे याही...

वसईत निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन.

नालासोपारा : संपूर्ण महाराष्ट्रातून अधिकारी घडविण्यासाठी तिमिरातूनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा...