ठळक बातम्या
sindhuprabhat logo
ठळक बातम्या
मीरा भाईंदरमध्ये ‘युवा सेना’ आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
आताच शेयर करा
Jun 14, 2021

भाईंदर (वेदिका मांगेला ) शिवसेना नेते,महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण,पर्यटन,राजशिष्टाचार मंत्री तथा युवासेनाप्रमुख आदित्य  ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध लोकोपयोगी  कार्यक्रमांचे आयोजन मीरा भाईंदर शहरात करण्यात आले होते. सध्याची गरज लक्षात घेता मीरा भाईंदर शहर युवा सेनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरालाही चांगला प्रतिसाद मिळाला.

आमदार प्रताप सरनाईक यांच्या मीरा भाईंदर जनसंपर्क कार्यालय येथे आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले. युवासेना सचिव , नगरसेवक पूर्वेश सरनाईक यांनी यावेळी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या ,  कोरोना काळात दिवसरात्र लोकसेवा करणाऱ्या , सतत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे यावेळी त्यांनी कौतुक केले. त्यांच्या हस्ते रक्तदान करणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

गेल्या वर्षी मार्चपासून आजपर्यंत या संपूर्ण कोरोना काळात मीरा भाईंदर शहरात आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सतत शिवसेना , युवा सेना यांच्यातर्फे वेळोवेळी रक्तदान शिबिरे आयोजित केली गेली आहेत व त्यातून मोठ्या प्रमाणात रक्त संकलित करण्यात आले. गरजू नागरिकांना , रुग्णांना वेळेवर रक्त मिळावे यासाठी आयोजित रक्तदान शिबीराना शहरातील जनतेने सतत चांगला प्रतिसाद दिला आहे. मीरा भाईंदरमधील नागरिक , रुग्ण याना गरजेच्या वेळी आमचे कार्यकर्ते रक्त उपलब्ध करून देतात , असे पूर्वेश सरनाईक यांनी सांगितले.

मीरा भाईंदर येथे युवा सेनेतर्फे आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराच्या आयोजनासाठी शहरातील युवा सेना पदाधिकारी , कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले व हे शिबीर यशस्वी केले. सदर प्रसंगी जिल्हाप्रमुख.प्रभाकर म्हात्रे, जिल्हासंघटक-मिरा भाईंदर.स्नेहल सावंत, विरोधी पक्षनेता प्रवीण पाटील,  गटनेता निलम ढवण, १४५ विधानसभा क्षेत्रप्रमुख मिरा भाईदर विधानसभा श्री विक्रम प्रतापसिंग, नगरसेवक उपजिल्हाप्रमुख मिरारोड राजू भोईर, उपजिल्हासंघटक-भाईंदर पुर्व प्र.क्र.१४ सह सौ.निशा नार्वेकर, शहरप्रमुख मिरारोड श्री.प्रशांत पालांडे, शहरप्रमुख भाईंदर पश्चिम श्री.पपू भिसे, शहरप्रमुख हायवे विभाग प्रभाग क्र,१४ काजुपाडा ते दहिसर चेकनाका जयराम मेसे, सचिव १४६ ओवळा मजिवडा विधानसभा मिराभाईंदर विभाग सचिन मांजरेकर, नगरसेवक जयंतीलाल पाटील, नगरसेवक अनंत शिर्के, नगरसेवक कमलेश भोईर नगरसेविका.स्नेहा पांडे, नगरसेविका.भावना भोईर, प्रावक्ता मिरा भाईंदर उत्तर भारतीय विभाग शैलेश पांडे, जिल्हा समन्वयक स्वराज पाटील, जिल्हा समन्वयक सागर सावंत, जिल्हा समन्वयक पवन घरत, जिल्हा समन्वयक उदय पार्सेकर, जिल्हा समन्वयक मंदार रकवी, शहर युवा अधिकारी भाईंदर पू. आराध्य सामंत, शहर युवा अधिकारी मिरारोड प्रियेश म्हात्रे, शहर समन्वयक संकेत गुरव, शहर समन्वयक श्रेयस जोशी, शहर चिटणीस गोपाल वैष्णव, शहर चिटणीस कल्पेश ओझा, आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

सर्व धर्मसमतेचा संदेश देणारी नववर्षाची शोभायात्रा.

विरार : (अक्षरा मांडवकर)   गुढीपाडवा म्हणजेच नवीन वर्ष या नव्या वर्षाचा उत्साह आनंदमय वातावरणात संपन्न झाला याच नव्या वर्षात सालाबादप्रमाणे याही...

वसईत निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन.

नालासोपारा : संपूर्ण महाराष्ट्रातून अधिकारी घडविण्यासाठी तिमिरातूनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा...