ठळक बातम्या
sindhuprabhat logo
ठळक बातम्या
कोरोनाची लाट थोपवण्यासाठी वसई विरार पालिका सज्ज.१५० खाटांचे बालरुग्णालय, १०० रुग्णवाहिका रिक्षा. पालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी घेतले धडकेबाज निर्णय.
आताच शेयर करा
May 12, 2021

कोरोनाची लाट थोपवण्यासाठी वसई विरार पालिका सज्ज.१५० खाटांचे बालरुग्णालय, १०० रुग्णवाहिका रिक्षा.

पालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी घेतले धडाकेबाज निर्णय.

नालासोपारा : (विजय देसाई )वसई विरार करांसाठी आनंदाची बातमी असून पालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी पालिकेची सूत्रे हातात घेतल्या नंतर कोरोनाची लाट थोपवण्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले असून येणारी तिसरी लाट ही लहान मुलांची असल्याची शक्यता असल्याने आयुक्त लोखंडे यांनी लहान मुलांसाठी १५० बेडचे रुग्णालय सुरु करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून कामाला सुरवात करण्यात आली आहे.लहान मुलांसाठी आयसीयू,एन आय सीयू ऑक्सिजन बेड बनवण्यात येणार आहेत.

 कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयांमधील बेडच्या उपलब्धतेविषयी माहिती त्वरित व वेळोवेळी उपलब्ध व्हावी यासाठी महानगरपालिकेची वेबसाईट लवकरात लवकर सुरु करणे,  त्याचप्रमाणे कोरोनाबाधित रुग्णांना तात्काळ योग्य त्या ठिकाणी योग्य उपचार मिळावेत याकरिता ९ प्रभाग समित्यांमध्ये प्रभाग समिती निहाय अति.आयुक्त व उप-आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली व प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त यांच्या देखरेखीखाली ९ ‘कोरोना कंट्रोल वॉर रूम’ कार्यान्वित करून प्रत्येक प्रभागातील कोरोना रुग्णांना योग्य रुग्णालयात उपचार देणेसंबंधी तसेच त्या प्रभागातील कोव्हीड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेची योग्य अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेसाठी महानगरपालिकेने मोठ्या रुग्णवाहिका खरेदी केलेल्या आहेत. त्याचबरोबर सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना किंवा ज्या रुग्णांचे होम आयसोलेशन करणे शक्य नसेल अशा रुग्णांना रुग्णालयात, कोविड केअर सेंटर मध्ये ने-आण करण्यासाठी कोव्हीड रिक्षा रुग्णवाहिका  ची सुविधा शहरात करण्याच्या सूचना आयुक्त सतीश लोखंडे यांनी दिल्या आहेत. यांनी दिल्या आहेत. यासाठी १००  कोव्हीड रिक्षा रुग्णवाहिका ह्या शहरात प्रभागनिहाय सर्वत्र उपलब्ध केल्या जातील जेणेकरून रुग्णांना त्वरित ने-आण करणे शक्य होईल. तसेच सदर रिक्षा गल्लीबोळाच्या ठिकाणी, लहान रस्ते असणाऱ्या ठिकाणी सहजरीत्या उपलब्ध होवू शकतील. त्याचप्रमाणे नागरिकांना सुरळीतपणे कोव्हीड प्रतिबंधक लसीकरण सुविधा मिळावी यासाठी महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागात लसीकरण केंद्र सुरु करण्याचे निर्देश आयुक्त लोखंडे यांनी पालिका उपायुक्त डॉ.किशोर गवस ,वैद्यकीय आरोग्य अधिकारी सुरेखा वाळके यांना  दिलेले असून प्रत्येक प्रभागात किमान १० लसीकरण केंद्र सुरु करण्याची महानगरपालिकेने नियोजन केले आहे. यापैकी २ लसीकरण केंद्रामध्ये ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग नागरिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. पुन्हा एकदा आयुक्त सतीश लोखंडे यांच्या आगमनाने कामचोर कर्मचारी अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून सामान्य नागरिकात चैतन्याचे वातावरण पसरले आहेत.त्यांनी घेतलेल्या निर्णयांचे स्वागत केले आहे.

संबंधित लेख

सर्व धर्मसमतेचा संदेश देणारी नववर्षाची शोभायात्रा.

विरार : (अक्षरा मांडवकर)   गुढीपाडवा म्हणजेच नवीन वर्ष या नव्या वर्षाचा उत्साह आनंदमय वातावरणात संपन्न झाला याच नव्या वर्षात सालाबादप्रमाणे याही...

वसईत निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन.

नालासोपारा : संपूर्ण महाराष्ट्रातून अधिकारी घडविण्यासाठी तिमिरातूनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा...