ठळक बातम्या
sindhuprabhat logo
ठळक बातम्या
माझ्या वाईट काळात मला साथ देणाऱ्या समाजाला मी वाऱ्यावर सोडणार नाही. रामराव महाराज यांना पद्मश्री पुरस्कार द्या – माजी वनमंत्री संजय राठोड
आताच शेयर करा
Apr 6, 2021

राठोड यांच्या ऐतिहासिक महाराष्ट्र दौऱ्याला वसईतून सुरवात.

वसई : माजी वनमंत्री संजय राठोड यांनी आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरवात नरवीर चिमाजी अप्पांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वसईतून देवीपाडा (तांडा) बंजारा पाडा व घाटीआळी, वसई येथून केली. यावेळी पत्रकार परिषदेत आम.संजय राठोड म्हणाले कि माझ्या वाईट काळात मला साथ देणाऱ्या समाजाला मी वाऱ्यावर सोडणार नाही. पोहरा देवीला वस्तुसंग्रहालय आम्ही तयार करणार असून समाजाचे गुरु रामराव महाराज यांना पद्मश्री पुरस्कार देण्याची मागणी यावेळी माजी मंत्री राठोड यांनी केली आहे. आज कोरोना आपला रौद्र रूप धारण केल असल्याने अनेक समाज बांधव स्थलांतर करीत आहेत. त्यांनी स्थलांतर करू नये यासाठी त्यांच्या अडी अडचणी जाणून घेवून त्या शासन दरबारी मांडून त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करणार त्यासाठी हा महाराष्ट्र दौरा करीत असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आम.संजय राठोड याचं औक्षण करताना पारंपारिक वेशातील भगिनी

शिवसेनेचे नेते माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्या नंतर त्यांनी आपल्या वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राठोड यांनी घरी न बसता लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी वसई पूर्वेकडील देवीपाडा येथील तांड्यावर बंजारा समाजाची भेट घेतली. ते तांड्यावर आल्या नंतर पारंपारिक वेशभूषेत महिलांनी आरती ओवाळून स्वागत केल. वसईच्या देवीपाडा येथील नागरिकांनी बंजारा समाजाचे अनेक लोक वसईत राहत असून त्यांच्या भागात शौचालयांची दुरवस्था झाली आहे. कोरोना मुळे काम मिळण मुश्कील झाले आहे. त्यामुळे उपासमारी ने माझा बांधव होरपळू नये म्हणून मी त्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रात फिरणार आहे. त्यांच्या सोबत बंजारा चित्रपट निर्माता व दिग्दर्शक प्रा.चंद्रकांत काळुराम पवार हे सुद्धा राहणार आहेत.वसई ही संघर्षाची भूमी आहे. याठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून कामगार वर्ग आलेला आहे.विदर्भ असेल ,खानदेश असेल,मराठवाडा असेल बाकीच्या राज्यातून कामगार वर्ग आलेला आहे.या असंघटीत कामगारांना भेटण्यासाठी कोरोना मध्ये त्यांची काय परिस्थिती आहे.किवा पुढच्या काळामध्ये काय होणार आहे. त्याबाबत चर्चा करण्यासाठी वारंवार त्यांचे फोन माजी मंत्री संजय राठोड यांना येत होते. वसईत देवी पाडा तांडा वस्ती असून २०० कुटुंब येथे राहतात.तसेच मधल्या काळात जी काही दुर्घटना झाली. आणि त्याच्यावरून जेकाही घाणेरड राजकारण केल गेल त्यामुळे सरकार मधून मी राजीनामा दिला त्यानंतर समाज, ज्या पद्धतीन समाज माझ्या पाठीशी उभा राहिला जो विश्वास समाजाने माझ्यावर दाखवला.माझ्या सारखा तांड्यातून आलेला मुलगा एका मंत्रिपदापर्यंत जातो याठिकाणी काम करीत असताना मी आत्तापर्यंत संघर्ष केलेला आहे.त्या समाजाला विश्वास देण्यासाठी आलो आहे. विमुक्त भटक्या,मागासवर्गीय,ओबीसी समाजावर कोणताही सरकार असो नेहमी अन्याय झालेला आहे. पूर्वी इंग्रजांनी या समाजाला गुन्हेगारी जमात म्हणून घोषित केल आहे. अशा समाजाची आता अत्यंत वाईट दयनीय अवस्था आहे. आमच्या संस्कृती चे जतन झाले पाहिजे म्हणून पोहरादेवी हे आमच संत सेवालाल महाराजांचं समाजाचे सद्गुरूच समाधी स्थळ आहे या पोहरा देवीला वस्तुसंग्रहालय आम्ही तयार करणार आहोत.त्याच काम सुरु झालेलं आहेत.समाजाचे गुरु रामराव महाराज यांना पद्मश्री पुरस्कार देण्याची मागणी यावेळी माजी मंत्री राठोड यांनी केली आहे. सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे याचं सरकार हे गोरगरीब जनतेच सरकार असून हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणाचा वसा घेवून आम्ही कार्य करीत होतो आणि करीत राहणार. कर नाही त्याला डर कशाची ..चौकशीतून जे काही सत्य असेल ते बाहेर येईल .तोपर्यंत मी माझ्या समाज बंधू भगिनींना वाऱ्यावर सोडायचं का ? पदे येतात जातात ,पद आल म्हणून हुरळून जाऊ नये ..आणि पद गेले म्हणून आपली समाजसेवा थांबवू नये. घेतला वसा टाकू नये. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाचा प्रचार आणि प्रसार करून समाजाच्या अडचणी सोडवण्यासाठी आमच सरकार आणि मी कटिबद्ध आहे.मी जरी मंत्री नसलो तरी तुमच्या समस्या विधिमंडळात सतत मांडत राहीन असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

संबंधित लेख

सर्व धर्मसमतेचा संदेश देणारी नववर्षाची शोभायात्रा.

विरार : (अक्षरा मांडवकर)   गुढीपाडवा म्हणजेच नवीन वर्ष या नव्या वर्षाचा उत्साह आनंदमय वातावरणात संपन्न झाला याच नव्या वर्षात सालाबादप्रमाणे याही...

वसईत निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन.

नालासोपारा : संपूर्ण महाराष्ट्रातून अधिकारी घडविण्यासाठी तिमिरातूनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा...