वसई (प्रतिनिधी ) : मुबई येथील लाईट ऑफ लाईफ संस्थेने आयोजित केलेल्या ऑनलाईन लाईट ऑफ लाईफ – आनंदो शाळा सक्षमीकरण शिक्षण महोत्सवात ३२ जिल्ह्यातून रयत शिक्षण संस्थेचे, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या शिक्षिका स्मिता पाटील यांनी उत्कृष्ट अभिप्राय मध्ये बाजी मारली असून त्याचं सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोरोनाच्या महामारीत विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रवाहात खंड पडू नये तसेच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास सुरळीत सुरू राहावा यासाठी राज्यातील शिक्षकांनी वेगवेगळ्या स्वरूपात आपल्या कल्पकतेने मोलाचे योगदान दिले आहे. त्या शिक्षकांच्या विचारांना व कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ऑनलाइन राज्यस्तरीय शिक्षण महोत्सव कार्यक्रम घेण्यात आला. महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यांमधून एकूण ६८३ शिक्षकांनी वैयक्तिक पातळीवर विविध ऑनलाइन स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते. रयत शिक्षण संस्थेचे, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या शिक्षिका स्मिता पाटील या उपक्रमशील शिक्षिका असून विद्यालयात अनेक शासकीय व संस्था पातळीवरील उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी असतात. तसेच त्या उत्कृष्ट सूत्रसंचालिका व संवादिका म्हणून सर्वांना परिचित आहेत. लाईट ऑफ लाईफ संस्थेने शिक्षकांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून गीत गायन स्पर्धा, स्वरचित काव्य लेखन स्पर्धा ,टाकाऊ पासून टिकाऊ ,वक्तृत्व स्पर्धा,सुलेखन स्पर्धा ,भित्तीपत्रक स्पर्धा,ऑनलाईन स्पर्धा घेण्यात आली होती. पाटील यांनी गीत गायन व स्वरचित काव्य वाचन स्पर्धेत भाग घेतला होता तसेच सहभागी झालेल्यां शिक्षकांकडून अभिप्राय मागवण्यात आले होते त्या मध्ये ३२ जिल्ह्यातून पाटील यांना उत्कृष्ठ अभिप्राय म्हणून निवड झाली आहे.यांच्या सुयशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील,रयत शिक्षण संस्था, रायगड विभागाचे चेअरमन व कोकण शिक्षक आमदार बाळाराम पाटील, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी सचिव गणेश ठाकूर, विद्यमान सचिव शिवणकर, कर्मवीर भाऊराव पाटील इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य आत्तार, एस.जी.एम.कॉलेज कराडचे प्राचार्य राजमाने ,रायगड विभागीय अधिकारी संजय मोहिते ,उपविभागीय अधिकारी फडतरे, माजी सहसचिव विलास महाडिक , कर्मवीर विद्याप्रबोधिनीचे नलगे, आनंदो शाळा सक्षमीकरण कार्यक्रमाच्या प्रमुख प्रकल्प व्यवस्थापिका कांचन थोरवे, प्रकल्प समन्वयक सारिका राऊत, सुशील घरत, संस्थापिका डॉक्टर विली, सीईओ रमेश दास वाणी, सीईओ कमल दमानिया, शिक्षण विभागाचे प्रमुख सुधीर कुमार गजभिये, प्रकल्प व्यवस्थापक अविनाश पाटील, तालुका शिक्षण सभापती, जिल्हा शिक्षण सभापती, स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील,विद्यालयाचे प्राचार्य तळपाडे , शिक्षक वृंद, शाळा समिती पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी व सदस्य, शिक्षक-पालक संघ पदाधिकारी व सदस्य, माता पालक संघ पदाधिकारी व सदस्य, पंचक्रोशीतील शिक्षण प्रेमी मंडळी व संस्था हितचिंतक,आजी माजी विद्यार्थी संघटना यांनी स्मिता पाटील यांचे अभिनंदन तसेच कौतुक केले आहे.