खाकी वर्दितली दर्दी, वृद्धाश्रमातील आई …. म्हणाली माझा बबन आला. -वसंत लब्दे
नालासोपारा : ( भाग्यश्री देसाई ) एरवी पोलिसांना शिव्याशाप देणारे आपण पाहत असलो तरी खाकी वर्दितली दर्दी नालासोपाऱ्याच्या वृद्धाश्रमात पाहायला मिळाली.जेव्हा मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाचे आयुक्त सदानंद दाते,अपर पोलीस आयुक्त एस जयकुमार, यांनी दिलेल्या आदेशाने पोलीस निरीक्षक वसंत लब्धे यांनी वृद्धाश्रमातील आजींचा गुलाब पुष्प आणि मिठाई देवून सत्कार करण्यात आला त्यावेळी आजीबाईंनी चक्क मिठी मारून आपला मुलगा बबन आल्याचा भास त्यांना झाला. क्षणभर लब्धे यांना ही गहिवरून आल आणि त्यांना त्यांच्या स्वर्गीय आईची आठवण आली.
आनंद दिवस हा रोजच साजरा केला पाहिजे,आपले जन्मदात्या आई वडिलांचा सांभाळ करा त्यांना वृद्धाश्रमात शक्यतो पाठवू नका जर अगदीच नाविलाज असेल तर त्यांना किमान आठवड्याला भेट देत जा त्यांची विचारपूस करा काळजी घ्या असे आवाहन नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्धे यांनी केल आहे.
मार्च महिन्यात जागतिक आनंद दिन म्हणून साजरा केला जातो.त्या अनुषंगाने मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाचे आयुक्त सदानंद दाते,अपर पोलीस आयुक्त एस जयकुमार, मुख्यालय पोलीस उपायुक्त विजयकांत सागर, पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांच्या मागर्दर्शनाखाली नालासोपारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत लब्धे, पोलीस निरीक्षक अहिरराव आणि ज्ञानेश्वर माचेवाल यांनी नाळे येथील स्नेहांजली ओल्डर केअर होम येथे वृद्धाश्रमात जावून भेट घेतली नालासोपारा पश्चिम नाळे गावातल्या स्नेहांजली होल्डर केअर होम येथे पोलीस निरीक्षक वसंत लदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट दिली. तेथे वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापिका जेनेट परेरा यांनी मेरी फर्नांडिस, कुसुम गोगटे, सुशीला कोचरेकर, आणि नॉटी कोलटकर यांच्याशी पोलिसांपासून लब्धे व त्यांच्या सहकाऱ्यांचा परिचय करून दिला. पोलिसांनी आजींना गुलाबाचे फुल व लाडू दिले ते बघताच त्या खूप आनंदित झाल्यात. एवढेच नव्हे तर सुशीला कोचरेकर या वयो वृद्ध आजीने पोलिस अधिकारी वसंत लब्धे यांना आपला मुलगा बबन समजून मिठी मारली. त्यानंतर सर्व आजींचा आराम करण्याची वेळ झाल्यामुळे पोलीस अधिकारी परतलेत.याबद्दल उपस्थित पत्रकारांशी संवाद करताना पोलिस निरीक्षक वसंत लब्दे यांनी सांगितले की, ज्या आईवडिलांनी आपल्या सांभाळले त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करावा,तसेच काही परिस्थितीमुळे वृद्धाश्रम मध्ये आहेत त्यांना मुलांनी वेळोवेळी भेटून त्यांना प्रेम द्यावे आणि जमेल तेवढे त्यांचा आशीर्वाद घ्यावेत असे सांगितले.