ठळक बातम्या
sindhuprabhat logo
ठळक बातम्या
विरारमध्ये मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या. लाखोंचा माल हस्तगत.
आताच शेयर करा
Mar 22, 2021

विरारमध्ये मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या. लाखोंचा माल हस्तगत.

विरार (प्रतिनिधी ) : सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या सराईत चोरट्यास विरार पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या काही दिवसापासून सोनसाखळी चोरांनी वसई विरार मध्ये हौदोस घातला होता त्या अनुषंगाने विरार पोलिसांनी तपास केला असता सोनसाखळी चोरट्याला पकडण्यात यश आले असून विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १४ गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्याच्या कडून तब्बल ५ लाख ७४ हजार ९५० ,रुपये किंमतीचा मुद्देमाल विरार पोलिसांनी आरोपींकडून हस्तगत केला आहे. विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोराने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. याची दाखल मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाचे आयुक्त सदानंद दाते,अपर पोलीस आयुक्त एस जयकुमार,पोलीस उपायुक्त प्रशांत वाघुंडे,सहाय्यक पोलीस आयुक्त रेणुका बागडे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक सोनावणे ,पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ,अभिजित टेलर ,संदेश राणे ,हर्षद चव्हाण,सचिन लोखंडे ,सचिन घेरे, विजय दुबळा भूषण वाघमारे,संदीप शेरमाळे,इंद्रनील पाटील,रवी वानखेडे,सुनील पाटील,पवन पवार,राहुल कर्पे.जगदीश मराठे, यांनी सापळा रचून अजय किरण शाह (२१) याला अटक केली आहे. शाह व त्याच्या साथीदाराने विरार पूर्व गास कोपरी परिसरात सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉकला बाहेर पडणाऱ्या महिलांना टार्गेट करून सोनसाखळी चोरून फरार होत असत. या चोरट्यांनी एक नव्हे तर तब्बल १४ जणांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून धूम ठोकत होते. विरार पोलिसांनी  परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज पडताळून पहिले तब्बल १५ दिवस सर्व मार्गातील सीसीटीव्ही तपासले असता किरण शाह हा असल्याचा संशय बळावला पोलिसांनी तांत्रिक बाबी तपासून आणि खबऱ्यांच्या नेटवर्क ने माहिती काढून किरण शहा हा विरार मधील बरफ पाडा येथे राहत असल्याचे माहिती मिळाल्या नंतर बराफ पाड्याला चारी बाजूने हेरून शाह याच्या मुसक्या आवळल्या मात्र त्याचा साथीदार शंकर हाल्या हा मुख्य आरोपी असल्याचे शाह याने पोलिसांना सांगितले. हे चोरटे ज्या सोनारांना हे सोने विकत होते. त्या सोनारांना सुद्धा पोलिसांनी चौकशी साठी बोलावले असल्याचे पोलीस उपनिरीक्षक संदेश राणे यांनी सांगितले. शंकर हाल्या आणि किरण शाह या जोडगोळीने विरार पोलीस स्टेशनच्या हद्दीत आरोपीने १४ गुन्हे केल्याच पोलीस तपासात उघड झाले आहे. आरोपी गुन्ह्यात वापरले गेलेली ५० हजार रुपये किमतीची होंडा शाईन मोटारसायकल, ५ लाख २४ हजार ९५० रुपये किंमतीचे १५३ ग्रॅम वजन असणारे सोन्याचे दागिने,असा एकूण ५ लाख ७४ हजार ९५० रुपये किंमतीचा मुद्देमाल विरार पोलिसांनी आरोपिकडून हस्तगत केला आहे. शाह याचा दुसरा साथीदार मुख्य आरोपी शंकर हाल्या हा आधीच्या गुन्ह्यात ठाणे तुरुंगात असून त्याला ताब्यात घेण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी सांगितले.

संबंधित लेख

सर्व धर्मसमतेचा संदेश देणारी नववर्षाची शोभायात्रा.

विरार : (अक्षरा मांडवकर)   गुढीपाडवा म्हणजेच नवीन वर्ष या नव्या वर्षाचा उत्साह आनंदमय वातावरणात संपन्न झाला याच नव्या वर्षात सालाबादप्रमाणे याही...

वसईत निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन.

नालासोपारा : संपूर्ण महाराष्ट्रातून अधिकारी घडविण्यासाठी तिमिरातूनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा...