मुंबईतील कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता, राज्यशासनाने कोविड -१९ ची नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्या अनुषंगाने गोरेगाव ( पूर्व ) येथील ओबेराँय मॉलला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर व उप महापौर अँड. सुहास वाडकर यांनी आज दि. २० मार्च २०२१ रोजी भेट देऊन कोविड -१९ च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार याठिकाणी करण्यात आलेल्या सोयी-सुविधांचा आढावा घेतला.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी ओबेरॉय मॉलची पाहणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. महापौर म्हणाल्या की, कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता, येथील प्रत्येक दुकानदाराला फेसशील्ड देण्याबाबत मॉलच्या व्यवस्थापनाला निर्देश दिले आहेत. त्यासोबतच राज्य शासनाकडून नवीन दिशानिर्देश प्राप्त झाल्यानंतर त्याप्रमाणे मॉलमध्ये व्यवस्था करण्याचे निर्देश संबंधित व्यवस्थापनाला दिले असल्याचे महापौरांनी सांगितले. संबंधित मॉलची पाहणी केल्यानंतर, याठिकाणी सर्वजण सामाजिक अंतर पाळून मास्क लावत असल्याचे दिसत आहे. त्यासोबतच मॉलमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला मास्क लावण्याची सूचना देणारे सूचना फलक घेऊन ठिकठिकाणी स्वयंसेवक दिसत असून ही चांगली बाब असल्याचे महापौरांनी सांगितले. कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता, इतर मॉलनी सुद्धा याप्रकारे खबरदारी घेणे गरजेचे असून या सर्व बाबींसाठी नागरिकांचे सहकार्य मिळणेही तेवढेच गरजेचे असल्याचे महापौरांनी सांगितले.
सर्व धर्मसमतेचा संदेश देणारी नववर्षाची शोभायात्रा.
विरार : (अक्षरा मांडवकर) गुढीपाडवा म्हणजेच नवीन वर्ष या नव्या वर्षाचा उत्साह आनंदमय वातावरणात संपन्न झाला याच नव्या वर्षात सालाबादप्रमाणे याही...