वसईतील अनधिकृत बांधकामाच आणि मनसुख प्रकरणाचे कनेक्शन ठाण्यात.अविनाश जाधव.
नालासोपारा : ( भाग्यश्री देसाई )वसई विरार मधील बांधकामाच आणि मनसुख प्रकरणाचे कनेक्शन ठाण्यात असून ठाण्यातील एका मंत्र्याला तुरुंगात जावे लागणार असल्याचा गौप्यस्फोट पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे. वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीत मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकाम होत असताना पालिका मुग गिळून बसली असल्याने त्यांचे डोळे उघडण्यासाठी हे प्रदर्शन मांडण्यात आले असून हे सर्व फोटो अतिरिक्त आयुक्त आशिष पाटील यांना देण्यात येणार असल्याचे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले आहे. यावेळी मनसेचे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, वसई तालुका अध्यक्ष प्रवीण भोईर, माजी नगरसेवक प्रफुल्ल पाटील, पालघर लोकसभा अध्यक्ष जयेंद्र पाटील ,प्रफुल्ल ठाकूर ,वितेन्द्र पाटील, जितेंद्र अग्रवाल, प्रफुल्ल पाटील ,समीर निकम,महेश पलांडे,प्रवीण राउत वसई, विरार, नालासोपार्यातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी गोखीवरे येथील ग्रिष्मा गार्डन येथे अनधिकृत बांधकामांचे चित्र प्रदर्शन आयोजित केले होते. या चित्रप्रदर्शनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला होता.
वसई-विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त गंगाथरन डी. यांच्या दालनात बैठक घेऊन मनसेच्या शिष्टमंडळाने महापालिका क्षेत्रातील लाखो स्क्वेअर फुटावरील अनधिकृत बांधकामांविरोधात त्यांच्याकडे तक्रार केली होती. अति.आयुक्त आशीष पाटील हे पदाचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात पैसे वसुली करतात. भूमाफियांना संरक्षण देतात. असे असतानादेखील पालिका प्रशासनाकडून अति.आयुक्त आशीष पाटील यांचे प्रताप आयुक्त गंगाथरन डी. हे उघड्या डोळ्यांनी खपवून घेतात. याप्रकरणामुळे मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. नुकतेच काही दिवसांपूर्वी मनसेचे ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील लाखो स्क्वेअर फुटावरील अनधिकृत बांधकामांवर लक्ष वेधत त्याचे चित्रप्रदर्शन भरवण्याचा इशारा दिला होता. तसेच स्वत: आयुक्त गंगाथरन डी. यांना या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन करण्याचा प्रमुख मान दिला होता.त्यानुसार बुधवारी भरवण्यात आलेल्या बेकायदा बांधकामांच्या या चित्रप्रदर्शनात अति.आयुक्त आशीष पाटील यांनी केलेल्या भ्रष्ट कारभाराचे वाभाडे काढण्यात आले. या चित्रप्रदर्शनाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दर्शविला होता. मनसुख प्रकरण ते अनधिकृत बांधकामाचे कनेक्शन ठाण्यात असून एका मोठ्या मंत्र्याला पोलीस कोठडीत जावे लागणार असल्याचे मनसेचे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी गौप्यस्फोट केला आहे.दरम्यान अतिरिक्त आयुक्त आशिष पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
Attachments area