ठळक बातम्या
sindhuprabhat logo
ठळक बातम्या
वसई विरार मधील स्थानिक फेरीवाल्यांना ओळखपत्र कधी मिळणार. ?
आताच शेयर करा
Mar 19, 2021

नालासोपारा : ( हितेश गायकवाड ) वसई विरार मध्ये दिवसेंदिवस फेलीवाल्यांची संख्या वाढत असून पालिकेच्या उदासीन धोरणामुळे स्थानिक फेरीवाले ओळखपत्रापासून वंचित राहिले आहेत.त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न जटील होत आहे. वसई विरार मध्ये पालिकेने स्थानिकांना प्राधान्य देवून ओळखपत्रे द्यावी अशी मागणी केली जात आहे. करोना लॉकडाऊन नंतर शहरात मोठ्या प्रमाणत अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या वाढू लागली आहे. यात परराज्यातील फेरीवाल्यांनी सुद्धा आपले बस्तान या शहरात मांडायला सुरवात केली आहे. फेरीवाल्यांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्याचा प्रस्ताव मागील ६ वर्षापासून लाल फितीत अडकून पडला आहे. यामुळे   पालिका फेरीवाल्यांन संदर्भात उदासीन असल्याने स्थानिक फेरीवाले सुद्धा उपरे ठरत आहेत. पालिकेने शहरात राहणाऱ्याच फेरीवाल्यांना बसायला दिले पाहिजे. त्यामुळे ठीक ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल/

 वसई विरार महानगर पालिकेने शहरातील फेरीवाल्यांची वाढती संख्या पाहता पालिकेने फेरीवाला धोरणाचा घाट घातला होता. पण ७ वर्षे उलटले तरी पालिका फेरीवाला धोरण ठरविण्यात अपयशी ठरली आहे. सन २०१५ रोजी महानगर पालिकेने फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले होते. त्या नुसार शहरात १५ हजार ६४६ फेरीवाले पालिकेने नोंदविले होते. यात बायोमॅट्रीक पद्धतीने नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देणार होते, यामुळे परराज्यातून आलेल्या फेरीवाल्यांची संख्या  कमी झाली असती आणि  शहरातील रस्त्यांवरचा कमी झाला असता. पण पालिकेच्या उदासीन धोरणाचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहेत.महासभेची मान्यता घेवून ओळखपत्र आणि व्यवसाय प्रमाणपत्र वाटप करण्यात येईल असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

संबंधित लेख

सर्व धर्मसमतेचा संदेश देणारी नववर्षाची शोभायात्रा.

विरार : (अक्षरा मांडवकर)   गुढीपाडवा म्हणजेच नवीन वर्ष या नव्या वर्षाचा उत्साह आनंदमय वातावरणात संपन्न झाला याच नव्या वर्षात सालाबादप्रमाणे याही...

वसईत निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन.

नालासोपारा : संपूर्ण महाराष्ट्रातून अधिकारी घडविण्यासाठी तिमिरातूनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा...