ठळक बातम्या
sindhuprabhat logo
ठळक बातम्या
नालासोपाऱ्यात रिक्षाचालकाने कर्जबाजारीपणाला कंटाळून केली आत्महत्या.
आताच शेयर करा
Mar 18, 2021

नालासोपारा :  कर्जबाजारी झाल्याने सुसाट रिक्षा चालवून रिक्षावरील ताबा सुटून रिक्षा नालासोपारा पश्चिमेकडील बौद्ध स्तूपा जवळील तलावात जावून बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार रिक्षाचालक कोंडीबा मारुती कोंडलकर वय ४० हा त्याची पत्नी मनीषा, मुलगी कोमल वय -१६, सुजाता १५ ,व  मुलगा आदिराज वय १२ असे गेल्या २ वर्षापासून भाड्याने राहत होते. लॉक डाऊन मुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच खालावली होती. कोंडीबा ला दारूचे व्यसन जडले होते. सुमारे १० ते १२ दिवसांपुर्वी शिवाजी सुळे यास त्याची जुनी तव्हेरा गाडीवर लोन करायचे होते. त्यासाठी जामीन राहण्यासाठी कोंडीबा व गोरेगावकर असे त्यांचेसोबत आगाशी पतसंस्था येथे गेले कोंडीबा यांनी जामीनदार राहण्यास नकार दिला, त्यानंतर ते घरात तसेच इतरांशी काहीएक बोलत नव्हते.कोंडीबा ची पत्नी मनीषा हिने पोलिसांना दिलेल्या जबाबात कोंडीबा दारु पिण्याचे व्यसन होते.आमच्या घरात आर्थिक अडचण होती.कोंडीबा हा शिवाजी सुळे यांच्या तवेरा गाडीकरीता जामीन राहीलेलो आहे, ते मला रद्द करायचे आहे. त्यानंतर सुळे यांनी कागदपत्रे परत करतो असे सांगितले होते.  १३ मार्च २०२१ रोजी रात्री १०.०० वाजता दारु पिवुन घरी आले थोडेसे  जेवुन कोणास काही एक न बोलता झोपले. आज रविवारी दिनांक १४ मार्च २०२१ रोजी पहाटे ०५.०० वाजताचे सुमारास घरात काहीएक न सांगता रिक्षा घेवुन गेले.त्यानंतर सकाळी ०६.०० वाजताच्या सुमारास काका यशवंत पोकळे. यांनी घरी फोन करून कळवले कि सकाळी ०६.०० वाजताच्या पुर्वी रिक्षा जोरात चालवुन जुन्या बौध्द स्तुपाजवळ रोडवरील स्पीडब्रेकरवरुन रिक्षाचा ताबा सुटुन रिक्षासहीत ते पाण्याच्या तलावात जावुन तलावातील पाण्यात पडुन मयत झालेले आहे.कर्जबाजारी झाल्याने हे टोकाचे पाउल उचलले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर हत्या कि आत्महत्या हे स्पष्ट होईल असे नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्धे यांनी सांगितले असून याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास नालासोपारा पोलीस करीत आहेत. 

संबंधित लेख

राज्यस्तरीय लेखन स्पर्धेचे पुरस्कार वितरण संपन्न.

मुंबई : मराठीत युद्धपत्रकारिता रुजवलेले ज्येष्ठ दिवंगत पत्रकार दि. वि.गोखले यांची 102वी जयंती  मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण ...

मंगळवारी  वज्रेश्वरी येथे सत्संग मेळाव्याचे आयोजन.

वज्रेश्वरी :  श्री स्वामी समर्थ सत्संग मेळावा आयोजन समिती मुंबई च्या वतीने मंगळवार, दि. १८ मार्च २०२५  श्री क्षेत्र वज्रेश्वरी, ता. भिवंडी, जि.ठाणे...

महिला एक शक्ती आहे महिलांनी स्वतःला ओळखायला शिका . पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले महिला एक शक्ती आहे महिलांनी स्वतःला ओळखायला शिका . पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले 

नालासोपारा : वसई विरार महानगरपालिकेने महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला, यावेळी महिलांनी कायद्याचा दुरुपयोग करू नये, योग्य वेळी कायद्याचा वापर...